जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

0

 

अमरावती – चिखलदरा तालुक्यातील बोराळा ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच हे अकार्यक्षम असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे विविध आरोप आहेत. या विषयी ग्रामस्थांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ आज पासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषणाला बसले आहेत. येत्या दोन दिवसात ग्रामस्थांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
छोटू महाराज वसू, प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.