
चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गांधी जयंती उत्साहात
चंद्रपूर :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे जटपुरा गेट येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
सत्य, अहिंसा व शांतीच्या मार्गाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला अधिष्ठान बहाल करणाऱ्या महात्मा गांधींना कार्यकर्त्यांनी “महात्मा गांधी अमर रहे” अशा घोषणा देत अभिवादन केले.
या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे, शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष बब्बुभाई ईसा, आदिवासी सेल शहर जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की, वकील सेल शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण वाकुळकर, शहर उपाध्यक्ष अरविंद परचाके, उपाध्यक्ष आसिफ सय्यद, समीर शेख, सरचिटणीस आनंद तिराणकर, उपाध्यक्ष रूपेश मुलकुलवार, निळकंठ येरमे, विलास नखाते, चंदन बघेल, सुभाष नन्नावरे, शहर सरचिटणीस वसीम शेख, पांडुरंग दडमल, श्रीकांत मानकर, रवींद्र वासनिक, सचिन पुंजारे, शोभा घरडे, सुमित्रा वैद्य यांच्यासह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.