Brijbhushan Singh ब्रिजभूषण सिंह यांची खासदारकी रद्द करा

0

नागपूर : (nagpur) देशातील महिला कुस्तीगीर यांनी खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh)  यांच्यावर लावलेल्या यौन शोषणाच्या आरोपाखाली त्यांना अटक व्हावी आणि त्यांची प्रदीर्घ काळापासून असलेली खासदारकी रद्द करावी या मागणीला घेऊन महिला रक्षण समिती नागपूर तर्फे नूतन रेवतकर यांचे नेतृत्वात शहरातील मुख्य भागात असलेल्या बस स्थानक परिसरात महिलांच्या समुहासह नारे निदर्शने करून निषेध करण्यात आला. ब्रिजभूषण सिंग यांचेवर पॉक्सो सह दोन गुन्हे दाखल असून आजपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही. आपल्या देशाचे नेतृत्व करून जागतिक स्तरावर आपल्या देशाला सन्मान मिळवून देणाऱ्या महिला खेळाडूना स्वतः साठी न्याय मागण्या करिता रस्त्यावर यावे लागले. ही आमच्या देशाची शोकांतिका आहे. केंद्रात भाजपाची सत्ता असून आजपर्यंत सुमारे 20 आमदार , खासदार व पदाधिकारी यांचे वर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. ” बेटी बचाव – बेटी पढाव बाद में भाजपा के पदाधिकारी को अत्याचार करने दो ” अशी भाजपा ची निती असून महिला विरोधी सरकार आहे . पंतप्रधानानी बृजभूषण सिंग यांची खासदारकी त्वरित रद्द करावी. तसेच अटक करावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी बबिता मांडवकर , प्रीती बेले , शकुन सनेश्वर , हफिजुंनिसा अली , माया नेवलकर , राधा सेलुकर , सोनाली गाणार , गीता नंदनवार , भावना बेलवंशी , सोनल रेवतकर , तारा चव्हारे , प्रमिला ब्राम्हणकर , साक्षी ठवरे , बरखा मांडवकर उपस्थित होते.

६ वेळा खासदार, ११ वर्ष अध्यक्ष; कधी कुस्तीपटूला कानाखाली मारली तर…

 

नवी दिल्ली: ऑलिंपिकमध्ये देशासाठी पदक जिंकून देणारे कुस्तीपटू सध्या नाराज आहेत. भारतीय कुस्ती महासंघाच्या विरोधात खेळाडू जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत. बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट या कुस्तीपटूंनी भाजप खासदार आणि रेस्लिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.एखाद्या वादात नाव समोर येण्याचे ब्रिजभूषण सिंह यांची पहिली वेळ नाही. याआधी अनेकदा अनेक वादात सिंह यांचे नाव समोर आले आहे.

सहा वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या सिंह यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. गेल्या ११ वर्षापासून ते WFIचे अध्यक्ष आहेत.भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. २०१९ साली आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सिंह यांनी १० कोटीहून अधिकची संपत्ती आहे. त्यांच्याकडे ९ कोटी, ८९ लाख ५ हजार ४०२ रुपयांची संपत्ती आहे. या शिवाय सिंह यांच्याकडे अनेक लग्जरी गाड्या आहेत. सिंह यांच्या पत्नीकडे ६ कोटी, ३४ लाख, ४४ हजार ५४१ रुपयांची संपत्ती आहे. पत्नीच्या नावावर दोन लग्जरी गाड्या देखील आहेत.सिंह यांच्याकडे ८ लाखांची एडेवर, ८ लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो तर पत्नीकडे १८ लाखांची टोयोटा आणि २० लाखांची फॉर्च्यूनर कार आहे. सिंग यांच्याकडे ५० ग्रॅम सोने आणि पत्नीकडे २०० ग्रॅम सोने आहे. गाड्या आणि सोन्या शिवाय सिंह यांना शस्त्रे बाळगण्याचा शौक आहे. सिंग यांच्या नावावर ५ बंदुका आहेत. तर पत्नीच्या नावावर देखील काही शस्त्रे आहेत.ब्रिजभूषण सिंह यांच्याकडे १ कोटींची शेती, २ कोटींची नॉन अॅग्रिकल्चर जमीन, २५ लाखांची व्यवसाइक इमारत आणि २ कोटींची रहिवाशी इमारत आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. तर रांची येथे झालेल्या १५ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांनी मंचावर एका कुस्तीपटूला कानाखाली मारली होती.