
(Nagpur)नागपूर-आमदारांमधील नाराजी घालविण्यासाठी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत देण्यात येत असताना हा विस्तार नवरात्रात होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. काही सूत्रांच्या मते घटस्थापनेला या विस्ताराचा मुहुर्त लागण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही.
मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांतील आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यात कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याचा फॉर्म्युला दिल्लीत ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे केंद्रातही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता व्यक्त होत असून लोकसभा निवडणुकीपूर्वी हा शेवटचा विस्तार असेल. या विस्तारात राज्यातून (Ajit Pawar)अजित पवार आणि शिंदे गटाला प्रतिनिधित्व मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.