
नागपूर: नागपूर वरून पुण्याला निघालेल्या इंडिगोच्या एका विमानाला आज टेकऑफ करत असताना एक पक्षी धडकल्याने थोडक्यात अनर्थ टळला. तातडीने हे इंडिगोचे 63135 विमान उडान रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तीन ते चार तासानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने किंवा याच विमान दुरुस्तीचे काम झाल्यानंतर रवाना करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ सूत्राने दिली.नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हरीण, जंगली डुक्कर,कुत्रे यांचा धावपट्टी परिसरात मुक्त संचार यापूर्वी देखील पाहायला मिळाला असून त्यामुळे अनेकदा हवाई उड्डाणे प्रभावित झालेली आहेत हे विशेष.