लेझर, एलईडी, डॉल्बीवर निर्बंध आणा

0

 

-विरोधी पक्ष नेते

(Mumbai)मुंबई: लेझर लाईट, एलईडी लाईट, डॉल्बीचे स्पष्ट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसू लागल्यानं आरोग्यासाठी धोकादायक बनलेल्या डॉल्बी, लेझर लाईट आणि एलईडी लाईटच्या वापरावर सार्वजनिक ठिकाणी कठोर निर्बंध आणावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Leader of Opposition Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्र्याना पत्राद्वारे केली आहे.

गेल्या गणेशोत्सवात काही तरुणांना डॉल्बीच्या आवाजामुळे ह्रदयविकाराचा झटका येऊन प्राण गमवावे लागले आहेत. तर लेझर प्रकाश झोतामुळे अनेक तरुणांच्या डोळ्यांना दुखापत झाल्याचे दिसून आहे. या घटनांची दखल घेऊन वड्डेटीवार म्हणाले. डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. तर लेझरमुळे अनेकांना डोळ्यांचा त्रास, डोळ्यांचे आजार होत आहेत. त्यामुळे या प्रकारांवर राज्यात बंदी लागू करण्याची गरज आहे. पुण्यातील हिंजवडीत योगेश अभिमन्यू साखरे, सांगलीतील तासगाव येथे राहणारा शेखर सुखदेव पावशे आणि सांगलीच्या वाळवा तालुक्यातील दुधारी येथे 35 वर्षीय प्रवीण शिरतोडे या तरुणाचाही असाच डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू झाला होता. अनेक मिरवणुकांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये लेझर प्रकाशझोत आकाशाच्या दिशेने आणि जमलेल्या लोकांच्या अंगावरून फिरवला जातो. लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाईटमुळे कायमचे अंधत्व येण्याचा धोका असतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाईटचा सार्वजनिक ठिकाणी वापर करण्याबाबत कठोर निर्बंध आणण्याची गरज वडेट्टीवार यांनी पत्रात मांडली आहे.