
अमरावती – 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी आमदार रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला औकातीत राहण्याचा सज्जड इशारा दिला होता. त्यांच्या या टीकेला आता खासदार नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर पटलावर केला आहे. जे खरं होतं ते मी बोलले म्हणून यशोमती ताईला झोंबले. कडक नोटा दिल्याचे पुरावे नसतात हे लहान लेकरालाही माहीत आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टर कडून बीपीची गोळी घ्यावी नाहीतर मी त्यांना पाठवते, असे म्हणत खासदार नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना पुन्हा डिचवले आहे.