राष्ट्रवादीतली फूट नेते राजकारणात, कार्यकर्ते संभ्रमात !

0

 

अनिल अहिरकर यांचा घणाघात

नागपूर : शरद पवारांच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी भाजपासोबत केलेला घरठाव हे बड्या नेत्यांसाठी एक राजकीय खेळी असली तरी या डावाने सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र संभ्रमात पडला आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया या पक्षाचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी नागपूर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात शंखनादशी बोलताना अनिल अहिरकर यांनी विविध मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केले. विशेषतः, वयाच्या ८३व्या वर्षी शरद पवारांनी मुख्य प्रवाहापासून दूर होत मार्गदर्शकाच्या भूमिकेत आले पाहिजे, ही त्यांची भावना बरीच बोलकी ठरली आहे. मी पवारांचा मुलगा नाही, म्हणूनच आपल्याला वारंवार खाली खेचण्याचा प्रयत्न होतो, ही अजित पवारांची खंत देखील अहिरकर यांनी यावेळी स्पष्ट केली.

वरती असेच सुरू राहिले, पक्ष विभाजित राहिला तर खाली ग्राम पातळीवर त्याचे पडसाद उमटणारच. आधीच काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी हे नेते निहाय गटं पडलेले राजकीय पक्ष आहेत. अशात अजित पवारांवरच पक्षात फूट पाडण्याची वेळ येणे योग्य नसल्याचं मत नोंदवतानाच , नागपूर -विदर्भात पक्षाची ताकद वाढवायची असेल तर विधानसभा निवडणुकीत पक्षानं आपल्या उमेदवारांसह मैदानात उतरणे गरजेचे असल्याचेही अहिरकर यांनी स्पष्ट केले.