
गोंदिया- जिल्ह्यात मुसळधार परतीचा पाऊस झाला त्याचा परिणाम जिल्ह्यातील धान पिकांवर पडला होता. परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले. अनेक शेतामध्ये परतीच्या पावसामुळे पिके जमीनदोस्त झाल्याचे काही तालुक्यात दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे भात पीकाचे कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेला शेतकरी आता परतीच्या पावसामुळे पुन्हा अडचणीत सापडल्यामुळे चिंतेत आहे. शेतकऱ्यांनी शासनाला आधीच भरपाईची मागणी केली होती, त्याच प्रमाणे आता परतीचे पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असल्यामुळे पिकांचे पंचनामे सुरु झाले असल्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले.