तुपकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

0

 

बुलढाणा – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आज बुलढाणा शहर पोलिसांनी अटक केली. तुपकर यांनी सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 20 नोव्हेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चा काढला. या महामोर्चात तुपकर यांनी सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मागण्या मान्य केल्या नाही तर 29 नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेऊ असा इशारा तुपकर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर तुपकर यांना आज पोलिसांनी अटक केली. सध्या त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले आहे. तुपकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती
श्याम अवथडे ,जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी दिली.