
पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणा-या मिनी बसचा वरंधा घाटात भीषण अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात बस खोल दरीत कोसळली. यात चालकाचा मृत्यू झाला तर सर्व 10 प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय.बस कोसळली तिथून अवघ्या 5 फुटांवर नीरा देवघर धरणाचं खोल पाणी होत, मात्र बस झाडाझुडपात अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून प्रवाशांचा जीव वाचवल्याचे वृत्त समोर आले आहे.
पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाटात हा अपघात झाला आहे. यानंतर नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात रात्री 2 वाजता ही धक्कादायक घटना घडली. घाटामध्ये असलेल्या रस्त्यांना सुरक्षा कठडे नाहीत. रस्त्यावर नवीन येणाऱ्या चालकांना याचा अंदाज येत नाही. या कारणामुळे गेल्या काही दिवसात या रस्त्यावर अनेक अपघात झालेले दिसून येत आहे.