गणेशपेठ बसस्थानक परिसरात फळ विक्रेत्याची चाकू भोसकून हत्या

0

 

नागपूर – गणेशपेठ बसस्थानक परिसरात एका फळ विक्रेत्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. योगेश उमरे असं मृतकाचे नाव आहे. चेतन बगमारे, चेतन पाटील, आणि अन्य साथीदार अशी मारेकऱ्यांची नाव आहेत. मृतक योगेश उमरे हा फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. यासोबतचं तो बस स्थानक परिसरातील चालणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीसोबत कमिशनवर कामही करत होता. गणेशपेठ बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स व्यवसायिक व्यवसाय आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात बस स्थानकातून बाहेर मिळणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे वळते करण्यासाठी कमिशन स्वरूपात लोकांना नेमण्यात येते. याच वादातून योगेश उमरेच्या हत्येचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला असल्याची माहिती गोरख भामरे, पोलीस उपायुक्त यांनी दिली.