ढाका: भारताच सलामीवीर इशान किशनने बांगलादेशविरुद्ध तडाखेबंद फलंदाजी करताना आज इतिहास रचला. शेवटच्या वनडे सामन्यात त्याने द्विशतक झळकावून बांगलादेशच्या गोलंदाजांची दाणादाण उडविली. हा पराक्रम करणारा तो जगातील सातवा आणि भारतातील चौथा फलंदाज ठरला आहे (Ishan Kishan enters ODI Double Hundred Club). इशानने केवळ १२६ चेंडूत द्विशतक पूर्ण केले व २१० धावा काढून तो बाद झाला. द्विशतकी खेळीत त्याने २३ चौकार आणि ९ षटकार मारले. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतके झळकावली आहेत. मात्र, इशान किशनने 126 चेंडूत एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 138 चेंडूत द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम गेलच्या नावावर होता. मात्र आता इशान किशनने त्याचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचला आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा – 264, मार्टिन गुप्टिल – 237, वीरेंद्र सेहवाग – 219, ख्रिस गेल – 215, फखर जमान – 210, इशान किशन – 210, रोहित शर्मा – 209, रोहित शर्मा – 208, सचिन तेंडुलकर – 200 या फलंदाजांचा समावेश आहे.
१२६ चेंडूत २१० धावा, भारताचा फलंदाज इशान किशनने रचला इतिहास
Breaking news
MAHARASHTRA
MAHARASHTRA