
डेहराडून, Dehradun 25 जुलै : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगरी राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, दरड कोसळणे यामुळे अनेक रस्ते बंद आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे 200 मीटर वाहून गेला आहे. महामार्ग बंद झाल्यामुळे 1000 हून अधिक भाविक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.1000 passengers were stranded as the Bardinath highway was washed away
हिमाचल प्रदेशात जूनपासून ढगफुटीच्या जवळपास 35 घटना घडल्या आहेत. गेल्या 24 दिवसांत 27 वेळा ढगफुटी झाली. पुरामुळे 158 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 606 घरांची पडझड झाली असून 5363 घरांचे नुकसान झाले आहे.Around 35 incidents of cloudbursts have occurred in Himachal Pradesh since June. There have been 27 cloudbursts in the last 24 days. 158 people have died due to floods. 606 houses collapsed and 5363 houses were damaged यासोबतच दिल्लीत देखील पुन्हा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदी अजूनही धोक्याच्या पातळीवर आहे. दिल्लीत आज, मंगळवारी सकाळी यमुनेची पाणीपातळी 205.45 एवढी नोंदवण्यात आली. तर हवामान विभागाने आज, मंगळवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच हवामान खात्याने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशात मुसळधार आणि मध्यप्रदेशात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याने म्हटले आहे.