
ठाण्यातून नववर्ष स्वागतच्या पूर्वसंध्येला मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक रेव्ह पार्टी पकडली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यात ही कारवाई केली आहे. या पार्टीत अनेक अमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच 100 तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाजवळ 100 लोक रेव्ह पार्टी करत होते. ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांनी ही संयुक्त कारवाई केली. या रेव्ह पार्टीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. या पार्टीत चरस, गांजा, दारू, एमडी अशी अनेक नशा उपलब्ध करून देण्यात आल्या होती. याशिवाय कासारवडवलीजवळील रेव्ह पार्टीच्या ठिकाणावरून पोलिसांनी 25 मोटारसायकली जप्त केल्या आहेत