

संदिपणी कॉन्व्हेंट स्कूलमधील चार विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरी
वर्धा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय ॲथलेटिक स्पर्धेत संदिपणी कॉन्व्हेंट अँड इंग्लिश मीडियम स्कूलमधील चार विद्यार्थ्यांनी विविध पदक प्राप्त केले.
दिनांक 10 ऑक्टोबर रोजी पोलीस मुख्यालय सिव्हिल लाईन, वर्धा येथे स्पर्धा उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये संदिपणी कॉन्व्हेंट अँड इंग्लिश मीडियम स्कूलमधील चार विद्यार्थ्यांनी कुमारी मीनल जितेंद्र चव्हाण (वर्ग 9, वयोगट 17) हिने 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अविस्मरणीय यश संपादन केले. कुमारी अंतरा गजानन किरडे हिने सलग 200 मीटर मध्ये सुवर्णपदक, 400 मीटर रौप्यपदक, 800 मीटर कांस्यपदक असे एकूण तीन पदके मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थी यश दिलीप बुंदे (वर्ग 10) याने 100 मीटर स्पर्धेत कांस्यपदक मिळविले.
ॲथलेटिक खेळ प्रकारामध्ये या वर्षी संदिपणी शाळेने एकूण ५ पदके पटकावत अभिमानास्पद निकाल नोंदविला आहे.
या सर्व निवड विद्यार्थ्यांची दि. 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे.
संदिपणी शाळा प्रशासनाच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे क्रीडा-शिक्षक व प्रेरणादायी मार्गदर्शक सुयोग मुकुंद ठकरे यांना दिले.