
नागपूर: लॉयन्स क्लब ऑफ नागपूरचे नितीन वर्मा यांनी शुक्रवारी भ़ंडारा येथे झालेल्या एका शानदार सोहळ्यात झोन चेअर पर्सन पदाची शपथ घेतली. लायन्स क्लबच्या डिस्ट्रिक्ट 3235H1 च्या वर्ष २०२५-२६ च्या कार्यकारणीचा शपथ ग्रहण समारंभ भंडारा येथील हेमंत सेलिब्रेशन हॉल येथे पार पडला. या कार्यक्रमात लाॅयन्स इंटरनॅशनलचे द्वितीय उपाध्यक्ष मनोज शहा यांच्या हस्ते नागपूरचे नितीन वर्मा यांना झोन चेअर पर्सन पदाची शपथ देण्यात आली.
यावेळी मनोज शहा यांनी नितीन वर्मा यांना इंटरनॅशनल तर्फ प्राप्त झालेली पिन प्रदान केली. कार्याची शपथही वर्मा यांना यावेळी देण्यात आली. लॉयन्स क्लब ऑफ नागपूरचे अध्यक्ष निधीश सावरकर, कोषाध्यक्ष रविकिशनपुरिया, राजेश जिंदल चेतन मारवा, सतीश जैन, रवींद्र सिंग खुराणा,रमेश जसोरे व उमेश महतो, लाॅयन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर भरत बलगट व अन्य मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन वर्मा यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात असून, त्यांना क्लबच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.