अमित शहा यांनी आमदार सुधीर मुनगंटीवारांना तातडीने दिल्लीत बोलावले; मोठा निर्णय होण्याची शक्यता

0

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून बाहेर ठेवल्याने नाराज असलेले भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी यापूर्वी जाहीरपणे बोलावून दाखवली. मात्र, मागील काही महिन्यांपासून ते सर्वांसोबत जुळवून घेताना दिसत असतानाच त्यांना भाजपचे नेते आणि केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बोलावून घेतले.