जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोची येथे ‘दिवाळी सेलिब्रेशन’ उत्साहात

0

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोची येथे ‘दिवाळी सेलिब्रेशन’ उत्साहात साजरे — विद्यार्थ्यांचा आनंद, संस्कृतीचा सोहळा

भद्रावती : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोची (केंद्र ढोरवासा, पं.स. भद्रावती) येथे जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. प्रेरणास्थान मा. डॉ. प्रकाश महाकाळकर साहेब (गटशिक्षणाधिकारी, पं.स. भद्रावती) यांच्या प्रेरणेतून आणि शा.व्य.स. पालक वर्ग सौ. माधुरी चिंचोलकर मॅडम तसेच कु. मनिषा चन्नावार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हात धुवा दिवस’, ‘वाचन प्रेरणा दिवस’, आणि ‘दिवाळी सेलिब्रेशन’ साजरे करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व, वाचनाची सवय आणि भारतीय संस्कृतीतील सणांचे मूल्य या विषयांवर विविध उपक्रमांद्वारे शिकवण घेतली. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी फुलांनी सजावट केली, सुंदर दिव्यांची आरास लावली आणि पारंपरिक पद्धतीने दिवाळीचे स्वागत केले.

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, सृजनशीलता आणि संस्कारांचे बीज रुजले. पालक व शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग पाहून समाधान व्यक्त केले.

शाळेच्या या सर्व उपक्रमांचे स्थानिक स्तरावर सर्वत्र कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रयत्न प्रेरणादायी ठरत आहे.