‘जिंदगी प्यार का गीत…’

0
‘जिंदगी प्यार का गीत...’
‘जिंदगी प्यार का गीत...’

नागपूर (Nagpur) 18 सप्‍टेंबर :- स्वरकमल संगीत अकॅडमी प्रस्तुत ‘जिंदगी प्यार का गीत… ‘ हा संगीतमय कार्यक्रम शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक हॉल मध्ये आयोजित करण्‍यात आला आहे. सायंकाळी 6 वाजता होणा-या या कार्यक्रमाची संकल्‍पना स्‍वरकमल संगीत अकॅडमीच्‍या संचालिका डॉ. मंजिरी अय्यर यांची आहे.

या कार्यक्रमात अरुंधती मांडवगणे, कल्पना कुणावार, विभा चौहान, दिपाली पनके, शिल्पा खानझोडे, सीमा सोनुले, प्राची दाणी, स्मिता बेंद्रे, रोहिणी कुंभारे या गायिका विविध सुमधूर गीते सादर करणार आहेत. संगीत संयोजन महेंद्र ढोले यांचे राहील तर निवेदन सोनाली बिरेवार करणार आहेत. या नि:शुल्‍क कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्‍येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.