
वर्ध्यात दगडाने ठेचून हत्या; महिला जखमी!
वर्धा: वर्ध्यातील देवळीत आज एका धक्कादायक घटनेत एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली तर एक महिला जखमी झाली आहे.हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना देवळी पोलीस क्वाटर्स समोरील एका मंदिरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक विनोद डोमाजी भरणे (वय 25) हा देवळी तालुक्यातील सोनेगाव आबाजी येथील रहिवासी होता.
विनोद भरणे देवळी येथून आपले काम आटपून गावाला जाण्यासाठी पोलीस वसाहती समोर ऑटोची वाट पाहत होता.त्यावेळी, करण कैलाश मोहिते (वय 22) नावाच्या आरोपीने त्याच्याकडून पैसे मागितले.विनोदने पैसे देण्यास नकार दिल्याने, करणने त्याला दगडाने डोक्यात ठेचून त्याची हत्या केली. या हल्ल्यात विनोदची आई जखमी झाली.
करण मोहिते हा देवळीच्या तहसील कार्यालयासमोरील झोपडपट्टीचा रहिवासी आहे.घटनेची माहिती मिळताच, देवळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले.
राहुल चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी या प्रकरणी हत्या आणि हत्येचा प्रयत्न यासह इतर गुन्हे दाखल केले आहेत आणि तपास सुरू आहे.
















