

नागपूर (Nagpur):- युवकांनी स्वत:मधील शक्ती ओळखून स्वयंविकास करावा, असे प्राचार्य डॉ. मेधा कानेटकर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना सांगितले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत श्रीनिकेतन आर्ट्स अॅण्ड कॉमर्स महाविद्यालय, नागपूर येथे करिअर संसद पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड करून तयार करण्यात आलेल्या करिअर संसदेमध्ये संसदेचे मुख्यमंत्री छत्रपालसिंग बघेल यांची तर नियोजन मंत्री म्हणून शुभांगी मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली. कायदे व शिस्तपालन मंत्री मंगलेश टेकाम, सामान्य प्रशासन मंत्री अभिषेक फुलमाळी, माहिती व प्रसारण मंत्री निलेश टंडन, उद्योजकता व विकास मंत्री प्रेमकुमार झाडे, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री वर्षा खापेकर, कौशल्य विकास मंत्री सोनाली जाधव, संसदीय कामकाज मंत्री अक्षय भदाडे, महिला व बालकल्याण मंत्री संजना साहू यांची नियुक्ती करण्यात आली. दिव्या वाघमारे, हर्षल उईके, आर्चीस चाचेरकर, ख़ुशी पांडे हे सदस्य राहतील.
या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री आणि जिल्हा निवड समिती सदस्य स्नेहल दहिवले यांची विशेष उपस्थिती लाभली. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. राजेंद्र मालोकर यांचीही उपस्थिती होती. करिअर कट्टा समन्वयक प्रा. सारिका पाटील यांनी तर संचालन डॉ. वैशाली धनविजय यांनी व आभार प्रदर्शन डॉ. गुडघे मॅडम यांनी केले.