

: डॉ. परीक्षित शेवडे यांनी जागवले मनामनांत राष्ट्रप्रेम
: ‘अभिवादन शेवाळकर’ महोत्सवाचा दुसरा दिवस
नागपूर (nagpur)
छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर आपण शिकलो नाही तर असेच ‘ पहलगाम ‘ घडत राहतील. आज गाव-गल्लीत पहलगाम उभे राहत असून हिंदुनी सजग राहण्याची गरज आहे. आज शिवशंभूच्या रक्तगटाची तरुणाई निर्माण होण्याची गरज आहे, असे विचार डॉ. परीक्षित शेवडे यांनी व्यक्त केले.
श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टतर्फे ‘अभिवादन शेवाळकर’ या त्रिदिवसीय महोत्सवाला गुरुवारी प्रारंभ झाला. व्हॉलिबॉल मैदान, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर येथे सुरू असलेल्या या महोत्सवात शुक्रवारी दुस-या दिवशी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि वक्ता डॉ. परीक्षित सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा महोत्सवाचे मार्गदर्शक विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी आहेत.
आज यावेळी पद्मश्री डॉ विलास डांगरे, श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे प्रफुल्ल माटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ. डांगरे यांचा यावेळी पद्मश्री ने सन्मानित झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. जयंत आदमने यांनी डॉ. परिक्षीत शेवडे यांचे स्वागत केले.
डॉ. शेवडे यांनी अतिशय ओजस्वी वाणीने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
बुऱ्हाणपूर हल्ला, जंजिरा किल्ला, पोर्तुगीजांवरील हल्ला अशा अनेक प्रसंगाचा उल्लेख करत डॉ. शेवडे यांनी संभाजी महाराजांचे धैर्य, शौर्य, रणनीती, गनिमी कावा, धक्कातंत्र अशा अनेक गुणांचा उल्लेख केला.
हिंदूना जागे करण्याकरिता छावा सारखी कलाकृती यावी लागते किंवा पहलगाम सारखा हल्ला व्हावा लागतो. पण संभाजी महाराज उत्तमरित्या
जाणून घ्यायचे असतील तर कथा, कादंबरी किंवा चित्रपटातून समजत नाही, असे ते म्हणाले.
शेवटी छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय च्या जयघोष ने परिसर दणाणून गेला.
प्रफुल्ल माटेगावकर यांनी प्रास्ताविकातून विविध उपक्रमाची माहिती दिली. कोविडमुळे खंड पडल्यानंतर महोत्सवाचे भव्य आयोजन होत असल्याचे सांगितले. स्वर्गीय राम शेवाळकर यांच्याही कार्याचा आढावा घेतला. त्यांनी डॉ. शेवडे यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन नीरज दोन्तुलवार यांनी केले.
संभाजी महाराज्यांच्या देशनिष्ठेची आज गरज –
डॉ. विलास डांगरे
डॉ. विलास डांगरे यांनी स्वर्गीय राम शेवाळकर व विजयाताई शेवाळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. आज देशाची स्थिती चांगली नसून काश्मीरची दुर्दैवी घटना बघता आता सर्वं हिंदुनी एकत्र येऊन देशासाठी लढण्याची वेळ आली आहे. ‘ बटोगे तो कटोगे ‘ हा संदेश लक्षात घेऊन आपण जागरूक राहणे गरजेचे असून छत्रपती संभाजीन् महाराजांच्या
धर्मनिष्ठा आणि देशनिष्ठेची आज गरज आहे, असे ते म्हणाले.
……..