अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीची बुद्धिमत्ता बघून व्हाल चकित!

0

मुंबई : जन्मलेल्या समर्था महालक्ष्मी पिल्लईने अवघ्या दोन वर्षे आणि दहा महिन्यांच्या वयात आपल्या असाधारण बुद्धिमत्ता आणि कौशल्यांसाठी जागतिक पातळीवर मान्यता मिळवली आहे. तिचा जन्म २६ ऑगस्ट २०२१ रोजी झाला, आणि पाच महिन्यांची असतानाच तिच्या आईने तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.

१४ महिन्यांच्या वयातच समर्थाला सर्वसाधारण ज्ञान (GK) प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या सर्वात लहान प्रतिभावान मुलीचा मान मिळाला आणि तिचे नाव भारताच्या जागतिक विक्रमात नोंदवले गेले. तिने अवघ्या पाच मिनिटांत ५४ GK प्रश्नांची उत्तरे दिली, तर नंतर ७० प्रश्नांची उत्तरेही अत्यंत कमी वेळात दिली. यासाठी तिला Influencer Books of World Records मध्ये स्थान मिळाले.

याचबरोबर युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम ने तिला सर्वाधिक GK प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल असाधारण प्रतिभावान मुलीचा किताब दिला आहे. समर्थाला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि सोशलली पॉईंट फाउंडेशन कडून सर्वात लहान GK मास्टर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

तिला ग्लोबल किड्स अचिव्हर्स अवॉर्ड ने शिक्षण क्षेत्रातील सर्वात लहान हुशार मुलीचा किताब देण्यात आला असून भारत न्यूज ने तिला प्राइड डॉटर ऑफ इंडिया आणि आयक्यू मास्टर म्हणून सन्मानित केले आहे. नुकतेच, तिला महाराष्ट्रातील सर्वात तरुण प्रतिभावान आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणून प्रतिष्ठित महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2024 मिळाला आहे.