लखनौ Lucknow : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम प्रगतीवर असताना राज्याचे मुख्यमंत्री yogi adityanath योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. अयोध्येचे धार्मिक महत्व लक्षात घेता तेथे Prohibition of meat and liquor मांस आणि मद्यावर बंदी घातली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या येथील रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाचा आढावा घेतला व प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मांस आणि मद्यावर बंदी घालण्याचे संकेत दिलेत. येत्या जानेवारी महिन्यात राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
देशातील अनेक धार्मिकस्थळांच्या परिसराता मांस आणि मद्यावर बंदी आहे. उत्तराखंडमध्ये हरिद्वार, ऋषीकेश येथे मागील अनेक वर्षांपासून मांस आणि दारुवर बंदी आहे. 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हरिद्वार, ऋषिकेश या ठिकाणांना मांसाहारापासून मुक्त करण्याचा उत्तराखंड सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळील परिसरात मांस आणि दारू विकली जात नाही.















