योगेंद्र यादव यांची टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

0
योगेंद्र यादव यांची टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा
yogendra-yadavs-criticism-is-a-thiefs-vomit-bomb

गोंदिया (Gondia) :- अकोला येथील योगेंद्र यादव यांच्या सभेत झालेला गोंधळ म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी व आयोजकांनी आपसात केलेली हाणामारी आहे. यात त्यांच्याच एका अन्सारी कुरेशी नावाच्या कार्यकर्त्याच्या नाकाचे हाड मोडले असून, ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या प्रकरणात यादव यांच्या कुणाही कार्यकर्त्याला काही काहीही इजा झाली नाही. त्यामुळे त्यांनी केलेली टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असेच म्हणावे लागेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथे मंगळवारी आयोजित जाहीर सभेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाची बाजू मांडली. ‘हा आमच्यावर नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर हल्ला आहे,’ अशी टीका ‘भारत जोडो’ अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी अकोल्यात केली होती.

वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला असेल तर त्यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर लाजिरवाणी वेळ आणली,’ असेदेखील ते म्हणाले होते. यावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश बनसोड, राजू राहुलकर, विनोद मेश्राम, दिनेश पंचभाई आदी उपस्थित होते.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठका सुरू असल्याचा गौप्यस्फोट केला. निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या दिवसांत उद्धव ठाकरे हे भाजपबरोबर जातील, असे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून घ्या की ते पुढचे पाच वर्षे तुमच्यासोबत राहतील, असे मुस्लिम समाजाकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसला सांगितले जात आहे.

Gondia gov in
Gondia map
Zp gondia
Gondia famous for
Gondia places to visit
Gondia famous food
Gondia Pin Code
Gondia district Information