

यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (वायसीसीई) च्या रुबी ज्युबिली निमित्ताने (1984-2024) 1999 चा बॅचचा रौप्य महोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा शनिवारी दत्ता मेघे सभागृहात पार पडला. इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, सिव्हिल, मेकॅनिकल, प्रॉडक्शन आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर शाखेच्या देश आणि विदेशातील सुमारे 150 माजी विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. वायसीसीईचे प्राचार्य डॉ.यू.पी. वाघे, तांत्रिक सल्लागार डॉ. मनाली क्षीरसागर, डॉ. एस. व्ही. प्रयागी रजिस्ट्रार, 1999 बॅचच्या कोअर कमिटी सदस्य पल्लवी शेंबेकर, प्रतिष्ठीत माजी विद्यार्थी अर्घया पालित, अजय सिंग, प्रणव देशपांडे, माजी विद्यार्थी संघटनेनचे उपाध्यक्ष डॉ. एस. जी. महाकाळकर, सचिव डॉ. अनिकेत मुन्शी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. वाघे यांनी स्वागतपर भाषणातून महाविद्यालयाच्या पुढील विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले.
माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कारकीर्दीत केलेल्या प्रगतीचे कौतुक करताना त्यांनी औद्योगिक संस्थांशी परस्परसंवाद वाढविण्यावरही त्यांनी भर दिला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात विकास अग्रवाल, विक्रम मल्ही, अमन रहेजा, अंशुल भार्गव, अर्घया पालित, पल्लवी शेंबेकर घड्याळपाटील, शिल्पा किरपाल विटणकर, अभिषेक भारद्वाज, नितीन उमप, प्रफुल्ल समरित, राजीबन घोषाल, अमित कुमार गुप्ता, अजय पवार, रणजोश्य चॅटर्जी यांचा समावेश होता. गौरव गोंधळेकर यांनी सूत्रसंचालन केले तर पल्लवी शेंबेकर व डॉ. सचिन महाकाळकर यांनी आभार मानले. डॉ. ए. एम. पांडे, शशिकांत चौधरी, डॉ. ए. व्ही. बापट, प्रा. एस. एस. आकांत, प्रो. ए. जे. बमनोटे, प्रा. आर. बी. गावंडे, डॉ. व्ही. एम. कृपलानी, डॉ. आर. एल. श्रीवास्तव, प्रो. बनकर असे अनेक माजी अधिष्ठाता, विभाग, प्राध्यापक कार्यक्रमाला उपस्थित होते.