खासदार गवळींच्या संस्थेचे खाते गोठवले

0

यवतमाळ YAWATMAL – यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’चे बँक खाते आयकर विभागाच्या वतीने गोठवण्यात आल्याची माहिती आहे. कलम 226 (3) अंतर्गत आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. सुमारे 8 कोटींचा आयकर थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
शिंदे गटाच्या खासदार असलेल्या BHAWANA GAWALI  गवळी यांना आयकर विभागाने आ्रर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नोटीस बजावली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गवळी यांच्या उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेत १९ कोटांचा गैरव्यवहार झाल्याचे आयकर विभागाने आपल्या नोटीसमध्ये नमूद केले. यापूर्वी २०२२ मध्ये इडीने भावना गवळी यांना गैरव्यवहारप्रकरणी तीन नोटीसा पाठवल्या होत्या. संस्थेचे संचालक सईद खान यांना ईडीने अटक केली होती. सईद खान यांनी संस्थेला बेकायदेशीरित्या कंपनीमध्ये रुपांतरीत करण्यासाठी मध्यस्थी केली. याशिवाय, ईडीने भावना गवळी यांच्यावर सात कोटी रुपयांच्या रोख रक्कमेचादेखील गैरवापर झाल्याचा ठपका ठेवला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार गवळी यांनी १९९८ मध्ये महिला आणि तरुणींना प्रशिक्षित करण्यासाठी प्रतिष्ठानची स्थापना केली होती. त्यावेळी भावना गवळी अध्यक्ष होत्या. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाशीमच्या रिसोड येथील आयुर्वेद महाविद्यालयासह देगाव येथील फार्मसी संस्था, सरकारी शाळा, शिरपूरमध्ये कनिष्ठ महाविद्यालय, वरीष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा तसेच वाशीम आणि यवतमाळ जन शिक्षण संस्था चालवण्यात येतात, हे विशेष.
दरम्यान, या नोटीसीमुळे खासदार गवळी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्या काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलेले आहेत. राजकीय वर्तुळात या नोटीशीची बरीच चर्चा आहे.