कक्षाला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांना डांबले; संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोष

0

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जाचे वाटप केले नाही म्हणून बँक निरीक्षकांच्या कक्षाला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. पेरणीचे दिवस जवळ आले असताना तालुक्यातील एकाही सेवा सोसायटीने पीक कर्जाचे वाटप केले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

Yavatmal | संस्था तपासणीच्या नावाखाली बँकेचे निरीक्षक आणि सहकारी संस्था सचिवांमध्ये वसूलपात्र रकमेच्या वसुलीवरून वाद निर्माण झाला. मे महिना संपत आलेला असतानाही पीककर्ज वाटपाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कक्षात कोंडून आपला संताप व्यक्त केला.

कक्षात बँकेचे उपसरव्यवस्थापक प्रफुल्ल येंडे, बँक निरीक्षक गजानन कापनवार, नीरज भालकर, वसुली अधिकारी अभय कदम होते. या घटनेची माहिती मिळताच मुंबई बाजार समितीचे संचालक तथा कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, बँकेचे संचालक बाबू पाटील वानखेडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे तातडीने कळंब बँकेच्या शाखेत पोहोचले. त्यांनी सोसायटीचे सचिव, बँक कर्मचारी आणि कुलूप ठोकणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेतली व आज, मंगळवारपासून कर्ज वाटप करण्याची ग्वाही दिली.

मे महिना संपत आला तरीही पीककर्ज वाटपाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कक्षात कोंडून संताप व्यक्त केला. केवळ 8 टक्के कर्ज वाटप झाले आहे. मे महिना संपत आला तरी 92 टक्के कर्ज वाटप व्हायचे आहे. तर कर्ज वाटप करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले.

पीक कर्ज वाटपात विलंब, बियाणे मिळण्यासाठी अडचणी यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. कळंब येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाद्वारे बँक अधिका-यांना कर्ज वाटप गतीने करण्याचा इशारा दिला.