सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर यात्रा

0

 

पुरंदर (Purandar) – अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली आहे. “येळकोट येळकोट जय मल्हार“, असा जयघोष करत श्री खंडोबाची पालखी कऱ्हा स्नानासाठी जाते. पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्या धमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलंय. खंडेरायाची जेजुरी आज पिवळीधमक झाली आहे.