

‘Savlyachi janu savli’ पंढरपुरात चालले तब्बल २५ तास अविरत भजन
मुंबई (Mumbai), 15 सप्टेंबर प्रेक्षकांना कायमच दर्जेदार आणि मनोरंजक कथा देणाऱ्या झी मराठी मराठीवर एक नवी कोरी मालिका दाखल होत आहे ‘सावळ्याची जणू सावली’ (‘Savlyachi janu savli’). या मालिकेची कथा सावली या आळंदी मध्ये राहणाऱ्या, रंग रूपाने साधारण पण गुणांनी असाधारण असणाऱ्या मुलीची.
सावलीला दैवी सुरांची देणगी लाभलेली आहे. वडील एकनाथ आणि आई कान्हू यांच्याप्रमाणेच सावलीचीही पांडुरंगावर अपार श्रद्धा आहे. विठ्ठलाच्या सावलीत तिने श्वास घेतला त्यामुळे एकनाथने तिचं नाव सावली ठेवलंय. तिच्या आयुष्यात त्याचं स्थान अनन्यसाधारण असच आहे.
या मालिकेच्या कलाकार आणि निर्मात्यांनी प्रमोशनच्या निमित्ताने पंढरपूर येथी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भेट दिली आणि विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि या प्रेरणादायी प्रवासासाठी आशीर्वाद घेतले. विठ्ठलाला आवडणाऱ्या तुळशीच्या पानांनी मंदिराला अप्रतिम सजावट केली होती. या ऐतिहासिक मंदिरातील केलेली ही सजावट मंदिरात उपस्थित असलेल्या भक्तांचे लक्ष वेधून घेत होती.
हेच अध्यात्मिक वातावरण वाढवण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांसाठी एक अविस्मरणीय अनुभव म्हणून पंढरपुरातील आणि आसपासच्या भजनीमंडळांद्वारे २५ तास अखंड भजन सेवा विठ्ठलचरणी सादर केली. या उपक्रमाची दखल ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’ने ही घेतली. हा उपक्रम सर्वांच्या मनात खोलवर रुजला. प्राप्ती रेडकर आणि साईंकित कामत यांच्या उपस्थितीने उपस्थित प्रेक्षक आणि पत्रकारांचा उत्साह वाढवला.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांनी मालिकेबद्दल चर्चा केली आणि आजचा पंढरपूरचा अनुभव शेअर केला. या मालिकेत सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, गौरी किरण अश्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या मालिकेचं अजून एक विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे या मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे एका मत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. मेघा पुन्हा मराठी डेली सोप मध्ये दिसणार आहे.
कोठारे व्हिजनची ही मालिका असून महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे या मालिकेचे निर्माते आहेत. विठ्ठलाची भक्त असलेली सावली कशी शोधेल तिच्या जीवनाची वाट? बघायला विसरू नका सावलीची गोष्ट ‘सावळ्याची जणू सावली’ २३ सप्टेंबरपासून दररोज संध्या. ७ वा झी मराठीवर.