
नवी दिल्ली new delhi -लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष Brijbhushan Singh बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आंदोलन संपवण्याची घोषणा केली (Wrestlers agitation called off) आहे. मात्र, आता आमची लढाई रस्त्यावर न लढता न्यायालयात लढणार असल्याचे या कुस्तीपटूंनी जाहीर केले. आम्हाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील. मात्र आता रस्त्यावर दंगल होणार नाही. महिला कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया Sakshi Malik, Vinesh Phogat and Bajrang Punia यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
या कुस्तीपटूंनी ट्विटमध्ये नमूद केले आहे की, आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची ७ जून रोजी सरकारसोबत चर्चा झाली होती. कुस्तीपटूंना दिलेल्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी महिलांचा छळ आणि लैंगिक शोषणाबाबत केलेल्या तक्रारींवरून एफआयआर नोंदविण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी तपास पूर्ण करून १५ जून रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे या प्रकरणात पैलवानांची कायदेशीर लढाई रस्त्यावर न जाता न्यायालयात सुरू राहणार आहे. दरम्यान, कुस्ती संघटनेतील सुधारणांच्या अनुषंगाने सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार नवीन कुस्ती संघटनेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून निवडणूक 11 जुलै रोजी होणार आहे. आम्ही सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीची वाट पाहणार आहोत. या कुस्तीपटूंनी काही दिवसांसाठी सोशल मिडियावरूनही ब्रेक घेतला असल्याची माहिती जाहीर केली आहे.
भाजपचे खासदार असलेले कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. सध्या दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अलिकडेच आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.