अयोध्येतून आलेल्या कलशाची पूजा

0

अमरावती -अमरावतीमध्ये स्थापित होणाऱ्या 111 फूट उंच श्री हनुमान मूर्ती भूमिपूजनसाठी श्री रामजन्मभूमी अयोध्या येथून आणलेल्या पवित्र मातीच्या कलशाचे आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांनी आज श्री क्षेत्र महाकाल येथे प्रभू श्री महाकाल दरबारात पूजन, अभिषेक व महाआरती करून हे कलश भक्ती शक्ती रथावर स्थापित केले. रथ पूजन करून रथाला भगवा झेंडा दाखवून रथ अमरावतीकडे रवाना केला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.