
एमटीडीसीतर्फे जागतिक पर्यटन दिन कार्यक्रम 27 सप्टेंबर रोजी
नागपूर (Nagpur), 24 सप्टेंबर
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) च्या प्रादेशिक कार्यालय, नागपूरतर्फे शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार क्लब, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर राहतील. पोलिस महानिरिक्षक, नागपूर (ग्रामीण) डी. के. पाटील भुजबळ (भा.पो.से.), जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (भा.प्र.से.), संजय मीना (भा.प्र.से), वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी व पर्यटन मित्र अजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
एमटीडीसीतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरीत केले जातील. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, विदर्भ, दिनेश कांबळे यांनी केले आहे.