

अमरावती- सन 1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिल द्वारे 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली गेली. शिफारस केल्याप्रमाणे सन 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’म्हणून साजरा केला जातो. आज भारतामध्ये बेरोजगारी वाढली आहे. लोकसंख्या पाहून अन्न धान्याचा पुरवठा सुद्धा कमी पडू शकतो. गुन्हेगारी सुद्धा जास्त प्रमाणात वाढू शकते. आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आरोग्य विभागाकडून आव्हान करण्यात येत आहे की, सगळ्यांनी आपले कुटुंब मर्यादित ठेवावे. हम दो हमारे दो त्याच्या ऐवजी “हम दो, हमारा एक” यामध्ये प्रेम भावना वाढेल या संदेशासह आज अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.