


डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून महात्मा गांधींजीच्या पुतळ्यापर्यंत यात्रेचे आयोजन
सर्व सेवा संघाचे आणि गांधी वादी संघटनाचे पुढाकार
वर्धा (Wardha) :-
गाझा पट्टीतील सुरू असलेला अमानवी नरसंहार, युक्रेन-रशिया युद्ध व जगभरात वाढत असलेल्या हिंसक घडामोडींबाबत गांधी जणांनी चिंता व्यक्त करीत त्यांनी सर्व सरकारे व जनतेने मानवतेच्या बाजूने आवाज उठविण्याचे आवाहन सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल यांनी केले.
आज सर्व सेवा संघ, सेवाग्राम यांचे वतीने वर्ध्यात विश्व शांती प्रार्थना आणि पदयात्रे चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी संबोधित केले. जगभर वाढत असलेल्या युद्ध, दहशतवाद, हिंसा आणि अमानवी घटना याच्या विरोधात आणि मानवता, शांतता व करुणा यांच्या समर्थनार्थ सर्व सेवा संघ, सेवाग्राम यांच्या वतीने “विश्व शांती प्रार्थना व पदयात्रा” चे आयोजन करण्यात आले.
ही पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. पदयात्रेनंतर सर्व धर्मांच्या सामूहिक प्रार्थनेने विश्वशांतीची भावना व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमात देशभरातून आलेले सर्व सेवा संघाचे सदस्य, सेवाग्राम व वर्धा येथील गांधी विचारांवर श्रद्धा असलेले नागरिक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल, प्रबंधक मोहम्मद शेख हुसैन, मंत्री अविनाश काकडे, प्रकाशन संयोजक अशोक भारत, नई तालीम समितीचे सचिव प्रभाकर पुसदकर, सेवाग्राम आश्रमाचे सचिव विजय तांबे, गांधी विचारवंत अतुल शर्मा, सुदाम पवार, प्रविण भोयर, सुषमा शर्मा, ज्ञानेश्वर ढगे, बाळासाहेब मिसाळ, मालती देशमुख, युवा सेल संयोजक भूपेश भूषण, अंकित मिश्रा, रश्मीन राठोड, प्रशांत नागोसे, जालंदर नाथ, नूतन माळवी, प्रफुल कुकडे, प्रवीण पेठे, अॅड. तृप्ती झिलपे, सिद्धेश्वर उमरकर, अशोक पगार, भाग्यश्री वेळे, तन्नकुमारी, मारुती, उमेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शंखानंद न्यूज करीता
रविराज घुमे, वर्धा.