दमक्षेमध्‍ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

0

डॉ. ग‍िरीश गांधी व प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांनी केले वृक्षारोपण

नागपूर(nagpur) 5 जुन :- दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे बुधवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्‍यात आला. वनराई फाऊंडेशनचे विश्‍वस्‍त डॉ. गिरीश गांधी व प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्‍या हस्‍ते दमक्षेच्‍या परिसरात वृक्षारोपण करण्‍यात आले.

यावेळी वनराई फाऊंडेशनचे सचिव निलेश खांडेकर, दमक्षेचे सहाय्यक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी, इतर पदाधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. दीपक कुळकर्णी यांनी पाहुण्‍यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
गिरीश गांधी म्हणाले की, पर्यावरण रक्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून ती कोणा एकट्याची किंवा सरकारची जबाबदारी नाही. हे कार्य आपल्या सर्वांनाच प्राध्‍यान्‍याने करायचे आहे.

त्‍यासाठी आज या येथे लावलेल्‍या रोपांचे संवर्धन करणे, त्यांची काळजी घेऊन त्यांचे झाडांमध्ये रूपांतर करणे, ही आपली जबाबदारी आहे.
विष्‍णू मनोहर यांनी पर्यावरण बदलाच्या सद्य:स्थितीत झाडांचे महत्त्व समजावून सांग‍ितले आणि भावी पिढ्यांसाठी झाडांचे संवर्धन करणे किती महत्‍त्‍वाचे आहे, हे पटवून दिले.