कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचे 31 मे रोजी पथसंचलन

0

नागपूर(Nagpur),30 मे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय’मध्ये सहभागी झालेल्या शिक्षार्थ्यांचे पथसंचलन शुक्रवार, 31 मे रोजी संध्याकाळी 6.25 वाजता रेशिमबागेतील स्मृती मंदिर परिसरातून काढण्यात येणार आहे. या वर्गाचा शुभारंभ 17 मे रोजी झाला असून, त्यात देशभरातील 936 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दीचे निमित्त साधून सक्करदरा चौकात अहिल्यादेवींच्या प्रतिमेला अभिवादन केले जाणार आहे.

पहिले पथसंचलन स्मृतिमंदिर रेशीमबाग येथील मुख्य द्वारातून निघून केशव द्वार, जनरल आवारी चौक, पक्वासा आयुर्वेदिक रुग्णालय, हनुमान मंदिर, कमला नेहरू महाविद्यालय गेट क्र 2, सक्करदरा चौक, गजानन चौक, हनुमान मंदिर मार्गे मुख्य द्वारातून स्मृतिमंदिर रेशीमबागेत परतेल.

दुसरे पथसंचलन रेशीमबाग द्वार क्रमांक 2 मधून बाहेर पडेल. पुष्पांजली अपार्टमेंट, व्हॉलीबॉल मैदान, गजानन चौक, शिरभाते रुग्णालय, आराध्या ज्वेलर्स, तिरंगा चौक, सक्करदरा चौक, गजानन चौक, हनुमान मंदिर मार्गे रेशीमबाग द्वार क्रमांक 2 मधून आत प्रवेश करेल.

चौकाचौकात नागरिक बंधु-भगिनींनी पथसंचलनाचे उत्साहात स्वागत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.