नवी दिल्ली : महिला आरक्षण हे राजीव गांधींचे स्वप्न होते, असा दावा करीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीी यांनी महिला आरक्षण कायद्याला पाठिंबा जाहीर केलाय. (Former Congress President Sonia Gandhi) आरक्षणासोबत जातनिहाय जनगणना देखील करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली असून भाजपने काँग्रेसच्या श्रेय घेण्याच्या प्रयत्नांवर आक्षेप व्यक्त केला आहे. (Women Reservation Bill) महिला आरक्षण विधेयकावर संसदेत चर्चेला सुरुवात झाली आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेत सोनिया गांधी सहभागी झाल्या.
सोनिया गांधी म्हणाल्या की, महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न होते. भारतीय महिलांनी सर्वांच्या कल्याणासाठी काम केले आहे. स्त्रीच्या सहनशीलतेचा अंदाज लावणे खूप कठीण काम आहे. भारतीय महिलांनी कधीही तक्रार केलेली नाही. महिलांची सहनशक्ती समुद्राएवढी आहे. लवकरात सवकर आरक्षण लागू करावे. महिला आरक्षणासोबत जातनिहाय जनगणना देखील करावी. तसेच लवकरात लवकर आरक्षण लागू करावे, असे देखील त्या सोनीया गांधी यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसच्या दाव्यावर आक्षेप घेतला. काँग्रेसने महिला आरक्षणाचे लॉलिपॉप केले. महिला आरक्षण विधेयकामुळे काँग्रेसची पोटदुखी वाढली आहे. सोनिया गांधी आता श्रेय घेत आहे. कॉंग्रेसने चुकीचे विधेयक आणले होते. त्यामुळे सोनिया गांधींनी राजकारण करू नये. महिला आरक्षण विधेयक हे पंतप्रधान मोदी आणि भाजपचे यश आहे, असे दुबे म्हणाले. दोन्ही सभागृहांमध्ये आजच हे विधेयक मंजूर करून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असणार आहे..
महिला आरक्षण राजीव गांधींचे स्वप्न होते-सोनिया गांधी
LOCAL NEWS
LOCAL NEWS
LOCAL NEWS















