

नागपूर (Nagpur) – जागतिक महिला दिनानिमित्त बुलढाणा येथे ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर ग्रुप व बुलढाणा अर्बन, आदिती अर्बन, राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन आणि परिवार अर्बन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा अजिंठा रोडवर 3 किलोमीटर धावणे आणि 6 किलोमीटर चालणे अशा दोन पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये बुलढाणा शहरातील जवळपास 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला.
महिला मॅरेथॉन स्पर्धा ही दरवर्षी मार्चमध्ये पहिल्या रविवारी आयोजित करण्यात येते. विशेष म्हणजे या मॅरेथॉनमध्ये 81 वर्षीय एक आजी देखील धावल्याची माहिती आयोजक अनुजा सावळे यांनी दिली.