“पुरुष निवडून येऊ नये म्हणून, महिला विधेयक”: संजय राऊत

0

मुंबई : महिला आरक्षणाचे ऐतिहासिक विधेयक बुधवारी लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. तर आज ते राज्यसभेत मंजुर केले जाणार आहे. मात्र,या विधेयकावर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून नकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे. (MP Sanjay Raut on women’s Reservation Bill) काही प्रमुख पुरूष नेते निवडून न येण्यासाठी हे विधेयक आणल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार राऊत म्हणाले की, लोकसभेत आणि विधानसभेत महिला आमदार आणि खासदारांची संख्या वाढवून महिला सबलीकरण होणार नाही. प्रश्न महिलांना प्रतिष्ठा आणि सन्मान देण्याचा आहे. देशाच्या राष्ट्रपती पदावर असलेल्या महिलेचा जर सन्मान होणार नसेल तर तुम्ही खासदार आणि आमदारांची संख्या वाढवून काय साध्य करणार आहात. काही पुरुष नेते निवडून येऊ नये, यासाठी हे विधेयक आणले गेले असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.