

चंद्रपूर (Chandrapur) :
– वाहतुक महिला पोलीस कर्मचारी ने रक्तदान करत प्राण वाचवले. वाहतूक पोलीस भर उन्हात आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्या बरोबर सामाजिक कर्तव्य ही पार पडतात. चंद्रपूर येथील महिला वाहतूक पोलिसांनी एका १५ दिवसाच्या बाळाला रक्तदान करून प्राण वाचवल्याची घटना चंद्रपुरात घडली. या घटनेमुळे वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीची आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधोरेखित झाली.
चंद्रपूरमधील एका १५ दिवसाच्या मुलीला तातडीने रक्त आवश्यक होते. वाहतूक शाखेतील म पो शी पल्लवी सदनवार या महिला कर्मचारीने मदतीला धावून जात तातडीने रक्तदान केले, ज्यामुळे रुग्णाचे प्राण वाचले. वाहतूक शाखेतील महिला कर्मचारी सदनवार यांनी प्रसंगावधान राखत तातडीने रक्तदान केले. या मदतीमुळे रुग्णांला मोठा दिलासा मिळाला.
या घटनेने वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या सामाजिक बांधिलकीची भावना अधोरेखित झाली. या महिला कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.