पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार का; सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले? 

0
pankaja munde
pankaja munde
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवारांनी महत्वाचे विधान केले. वरिष्ठांच्या निर्णयानंतर नाव सांगितले जाईल, असे ते म्हणाले. (Pankaja Munde Rajya Sabha)
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेचे विश्लेषण करून ज्या उणिवा व ज्या पद्धतीने खोटा प्रचार झाला, या संदर्भात चर्चा झाली. तसेच विधानसभा, विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विश्लेषण चांगलं झालं. महाराष्ट्राच्या हितासाठी महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने चर्चा झाली. आपल्याला उत्तम योजना दिल्या पाहिजे यावर पंधरा दिवसापूर्वी चर्चा झाली.चांगल्या योजना देणे महायुतीच्या सरकारची जबाबदारी व कर्तव्य असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गेल्या काही दिवासांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ काय निर्णय त्यावर अवलंबून असल्याचे म्हणाले.  (Sudhir Mungantiwar)