माधुरी दीक्षित भाजपकडून लढणार?

0

 

(Mumbai)मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) भाजपकडून निवडणूक लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. भाजप नेत्या पूनम महाजन यांच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून माधुरी किंवा (Vinod Tawde)विनोद तावडे यांना उमेदवारी मिळेल, असा दावा या या प्रकरणी केला जात असतानाच राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी असा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. (Lok Sabha Election 2024)

अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यापूर्वी देखील अशी चर्चा रंगली होती. पण सध्या तरी राजकारणात प्रवेश करण्याचा आपला विचार नसल्याचे सांगत माधुरी दीक्षित हिने या चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण आता पुन्हा एकदा या चर्चांना सुरुवात झाली आहे. पण अशी कोणतीच चर्चा भाजपमध्ये सुरू नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने एका वाहिनीशी बोलताना दिली. लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय केंद्रातूनच होतो, याकडेही या नेत्याने लक्ष वेधले. मात्र, या साऱ्या चर्चेवर खुलासा करताना माधुरी दीक्षितने एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत भूमिका स्पष्ट केली आहे. या फक्त अफवा असून मी कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही, असे तिने स्पष्ट केले आहे.