फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार?

0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे उलथापालथीचे संकेत मिळत असून, देवेंद्र फडणवीस यांचे नाव तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वी 2014 ते 2019 या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. त्यावेळेस त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकास, शेती सुधारणा आणि औद्योगिक गुंतवणुकीच्या योजनांवर भर दिला गेला. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पक्षाला अडचणींचा सामना करावा लागला.

2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, हे सरकार केवळ काही तास टिकले आणि त्याला “औटघटकेचे सरकार” म्हणून ओळखले गेले.

आता, फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, तर ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवतील. फडणवीस यांच्या नेत्याच्या धडाडीने आणि प्रशासनातील अनुभवाने राज्याला पुन्हा मजबूत नेतृत्व मिळेल, असा भाजप कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.

दरम्यान, अधिकृत घोषणा होताच राज्याच्या राजकारणात मोठे घडामोडी घडू शकतात. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण दिशा ठरेल, असे मानले जात आहे.