
बुलढाणा BULDHANA – आदिवासी कोळी समाजाला ADIWASI KOLI SAMAJ अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून समाजातील बांधवांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्यामुळे आंदोलन संतप्त झाले आहे. आज बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलकांनी उपोषण मंडपातच अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.
तसेच यावेळी सरकार विरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. तर आज संतप्त आंदोलकांनी काही वेळ अर्धनग्न आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. पुढील काळात सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असेही आंदोलकांनी सांगितले आहे.