
गोंदिया GONDIYA – शेतात जाण्यासाठी पांदण रस्ता मिळावा, यासाठी महागाव तालुक्यातील पांडुरंग लांडगे या शेतकर्याचा पाच वर्षापासून संघर्ष सुरू आहे. शासकीय कार्यालयाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.मात्र, तरीसुद्धा आतापर्यंत चार वेळा शेतकर्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आली. उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून केवळ आश्वासन देऊन बोळवण करण्यात आल्याची खंत शेतकऱ्याने व्यक्त केली.
गेल्यावर्षी अडीच एकरातील ऊस नष्ट झाला. त्यामुळे शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. शेतकऱ्याच्या या आंदोलनामुळे प्रशासनाची दाणादाण उडाली होती.