

(Mumbai)मुंबई: एससी आणि एसटी प्रवर्गातील लोक कोणाला त्यांच्या आरक्षणात घेतात का? मग ओबीसीतच आरक्षण घेण्याचा अट्टाहास का? असा सवाल (State Minister for Food and Civil Supplies Chhagan Bhujbal)राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांना केला आहे.
भुजबळ म्हणाले, आम्ही मराठा आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न देता मराठ्यांना आरक्षण द्यावे हे केवळ माझेच नाही तर (Sharad Pawar)शरद पवार आणि (Chief Minister Shinde)मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्वच नेत्यांचे म्हणणे आहे. मग ओबीसीतच आरक्षण घेण्याचा अट्टाहास का?
भुजबळ म्हणाले की, ओबीसीमध्ये ३७४ जाती आहेत. आरक्षण ५४ टक्केच आहे. त्यामुळे त्यात मराठा समाज समाविष्ट झाल्यास अनेक छोट्या जात समुहांवर अन्याय होईल. आमच्यात मराठे आल्यावर कोणाला काहीच मिळणार नाही, असे भुजबळ म्हणाले.