

२५ व्या वर्षी तासगावमध्ये दणदणीत विजय
रोहित पाटील (Rohit Patil ) यांनी २७ हजारांच्या लीडने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी संजयकाका पाटलांचा पराभव केला आहे.यंदा तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी लढत पाहायला मिळाली.या दमदार लढाईत रोहित पाटील यांनी जोरदार विजय प्राप्त केला आहे.
रोहित पाटील हे दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर. आर पाटील यांचे चिरंजीव आहेत.त्यांच्यासाठी ही लढाई अतिशय प्रतिष्ठेची झाली होती.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती.
त्यांना ही उमेदवारी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी मिळाली होती.या संधीचं त्यांनी सोन केलं आहे. रोहित पाटील यांनी २७ हजारांच्या लीडने दणदणीत विजय मिळवला आहे.
त्यांनी अजित पवार गटाच्या संजयकाका पाटलांचा पराभव केला आहे.त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण असून राज्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.