बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता कोण ?

0

मुंबई (Mumbai): डी गुकेश यांचे पूर्ण नाव डोमराजू गुकेश (Dommaraju Gukesh)असून तो चेन्नईचा रहिवासी आहे. गुकेशचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. त्याने वयाच्या 7 व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले.

भारताचा गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा पराभव करत हा खिताब पटकावला आहे. डी गुकेश विश्वनाथन आनंदनंतर गुकेश आता भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुकेशने या गॅरी कास्पोरोव्ह याचा विक्रमही मोडला. गुकेशची कामगिरी ही भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.

गुकेश हा सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. तसेच अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या आधी विश्वनाथन आनंद 2012 मध्ये बुद्धिबळ चॅम्पियन बनला होता. गुकेशने याआधी वयाच्या 17 व्या वर्षी FIDE ही मानाची बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली होती.  आता गुकेशने चीनच्या लिरेनचा 14 डावानंतर 7.5-6.5 अशा गुणांनी पराभव केला.